हिंगोली शहरासह जिल्ह्य़ात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने शेतक ऱ्यांची चांगलीच पुरेवाट केली आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांवर घाला तर घातलाच, तसेच यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाच्या पीकनिहाय नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण होत नाही तोच शुक्रवारी पुन्हा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले.
शुक्रवारी दुपारी तीन-चारच्या दरम्यान हिंगोली तालुक्यात खानापूर, सावरखेडा, लोहगाव, डिग्रस, औंढय़ातील लाख मेथा, यहळेगाव, कळमनुरी तालुक्यात आखाडा बाळापूर, वरंगा, सेनगाव तालुक्यात शेगाव खोडके, खेरखेडा, पुसेगाव, वसमत तालुक्यात हट्टा, कुरुंदा आदी ठिकाणी गारांसह पाऊस झाला.
 यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात एक हजार ९८६ हेक्टर क्षेत्राचे ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक नुकसान झाले. सरकारच्या आदेशावरून नुकतेच पीकनिहाय नुकसानीचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले. या नुकसानीचा अहवाल सादर होत नाही, तोच तिसऱ्यांदा अवकाळी पावसाने नुकसान केले.

Story img Loader