पंचम निषाद या संगीत प्रसारासाठी कार्यरत संस्थेने शनिवार, १९ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता फाईन आर्ट्स सोसायटी, चेंबूर येथील शिवास्वामी सभागृहामध्ये ‘म्युझिक अॅण्ड ऱ्हिदम मास्टस’ या संगीत मैफलीचे आयोजन केले आहे. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील रामपूर-सहासवान घराण्याचे गायक उस्ताद राशिद खान आणि तबलानवाझ उस्ताद झाकीर हुसैन असे दोन दिग्गज प्रथमच मैफलीमध्ये एकत्रितपणे आपली अदाकारी सादर करणार आहेत. या ऐतिहासिक घटनेबरोबरच इमादखानी घराण्याचे सतारवादक बुद्धादित्य मुखर्जी हेसुद्धा तब्बल २० वर्षांच्या कालखंडानंतर या मैफलीतील दुसऱ्या सत्रात उस्ताद झाकीर हुसैन यांच्याबरोबर वादन करणार आहेत. वादन आणि गायनातील तीन दिग्गजांना एकत्र ऐकण्याची संधी या निमित्ताने मुंबईकर शास्त्रीय संगीतप्रेमींना मिळणार आहे. संपर्क – २४१२४७५०
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in