यंदाही येत्या रविवारी विराट मोर्चाचे ओयाजन राष्ट्रीय विमुक्त घुमंतू महासंघ व राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाच्या वतीने माजी खासदार व बंजारा, भटक्या विमुक्ताचे राष्ट्रीय नेते हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केला आहे.
भटक्या विमुक्तांच्या उत्थानासाठी नेमलेल्या बाळकृष्ण रेणके आयोग त्वरित लागू करावा व इतर २१ मागण्यांसाठी विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारने भटक्या विमुक्तांचे जीवनमान उंचावण्यासाठी नेमलेल्या रेणके आयोगाच्या शिफारशी केंद्र सरकारला २००८ साली सादर करण्यात आल्या असून आजपर्यंत तो लागू करण्यात आली नाही. याच मागणीसाठी रविवारी आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. यात संत रामराव महाराज, संत प्रेमसिंग महाराज, लक्ष्मण गायकवाड , मच्छिंद्र भोसले, मधुकर पवार, डॉ. चव्हाण, कैलास राठोड व भटके विमुक्त बांधव पारंपरिक वेषभुषेत उपस्थित राहणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jan 2014 रोजी प्रकाशित
बंजारा क्रांतीदलाचा रविवारी मंत्रालयावर मोर्चा
यंदाही येत्या रविवारी विराट मोर्चाचे ओयाजन राष्ट्रीय विमुक्त घुमंतू महासंघ व राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाच्या वतीने माजी खासदार व बंजारा, भटक्या विमुक्ताचे राष्ट्रीय नेते
First published on: 03-01-2014 at 07:21 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This sunday banjara krantidal movement on ministry