परक्या जातीत किंवा धर्मात लग्न ठरविल्यानंतर नातेवाइकांचा होणारा विरोध, एकमेकांच्या जाती-धर्माबद्दल असणारे असंख्य गैरसमज खोडून काढताना होणारी दमछाक आणि या सगळ्याला तोंड देताना कणखर होत जाणारा आत्मविश्वास..! अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात समाजातील आंतरविरोधांचे असे अनेक कंगोरे उलगडले.
श्रीकांत सावंगीकर, अरुणा तिवारी, जोसेफ पिंटो आणि कल्पना जोसेफ जोशी आदिंनी या वेळी आपले आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाहांसंबंधीचे अनुभव कथन केले. समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर या वेळी उपस्थित होते.
तिवारी म्हणाल्या, ‘‘संघर्षवाहिनीच्या संस्कारांतून आल्यामुळे लग्नात हुंडा द्यायचा नाही आणि जातीत लग्न करायचे नाही हे मी आधीच ठरविले होते. जेव्हा अन्वर राजन यांचे स्थळ सुचविले गेले, तेव्हा प्रथम परधर्माबद्दल असणाऱ्या गैरसमजांमुळे माझ्याही मनात चलबिचल झाली होती. परंतु जेव्हा त्यांना प्रत्यक्ष भेटले, तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात नाकारण्यासारखे काही दिसलेच नाही! आम्ही आंतरधर्मीय लग्न करतो आहोत हे गावातील काही लोकांना कळल्यावर त्यांनी पोलिसात तक्रार केल्यामुळे मला पोलिस चौकीतही बोलविण्यात आले होते. मात्र चळवळीतील काही जण आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यामुळे हा विरोध मावळला. लग्नानंतर मी नाव बदलणार नाही, मांसाहार करणार नाही, कोणताही धार्मिक विधी करणार नाही अशा काही अटी घातल्या होत्या त्याही सासरच्या मंडळींनी आनंदाने स्वीकारल्या.’’
जोसेफ पिंटो यांनी सांगितले, ‘‘वेगवेगळे समाज एकमेकांबद्दल अगदी अनभिज्ञ असतात. माझे व कल्पनाचे लग्न होण्यापूर्वी तिच्या घरच्यांनी माझ्या घेतलेल्या ‘मुलाखती’तून ही गोष्ट प्रकर्षांने जाणवली! आंतरजातीय व आंतरधर्मीय लग्नांमुळे समाजाचे चित्र एकदम बदलेल अशी अपेक्षा करता येत नाही. अशा प्रयोगांना विरोध कराणाऱ्यांची शक्तीही प्रचंड आहे. मात्र रूढ रीतीरिवाजच पुढे नेले पाहिजेत हा समाजाचा आग्रह मोडून काढून प्रेमापोटी जोडप्यांनी संघर्ष करायला हवा.’’
असे उलगडले सामाजिक आंतरविरोधांचे कंगोरे..
परक्या जातीत किंवा धर्मात लग्न ठरविल्यानंतर नातेवाइकांचा होणारा विरोध, एकमेकांच्या जाती-धर्माबद्दल असणारे असंख्य गैरसमज खोडून काढताना होणारी दमछाक आणि या सगळ्याला तोंड देताना कणखर होत जाणारा आत्मविश्वास..! अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात समाजातील आंतरविरोधांचे असे अनेक कंगोरे उलगडले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-01-2013 at 01:35 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This way the soical interopposed gets opend