शहापूर तालुक्यातील कानवे ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल समारे आले असून नऊ जागांपैकी तीन जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. जिजाबाई मुकणे, रमेश मोरघे आणि प्रतिज्ञा रिकामे अशी उमेदवार बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची नावे आहेत. उर्वरित सहा जागांसाठी १५ उमेदवारांमध्ये लढत होती. यात हरी फर्डे, आशा फर्डे, गणेश वाघ, गोपाळ वाघ या उमेदवारांचा विजय झाला आहे. बेबी सातवी यांचा दोन जागांवर विजय झाला आहे. दरम्यान तालुक्यातील लवले आणि नांदवल याग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज प्राप्त न झाल्याने निवडणूक घेण्यात आली नाही.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 29-11-2012 at 12:04 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three applicants elect with no oppsed