शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी दोन शिक्षक संघटना व आशा सेविकांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आशासेविका संघटना, अशा एकूण तीन संघटनांनी आज, मंगळवारी जिल्हा परिषदेवर मोर्चे काढले. त्यामुळे हा परिसर कर्मचाऱ्यांच्या प्रशासन विरोधी घोषणांनी दणाणून गेला होता.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या जिल्हा शाखेच्यावतीने आजपासून जि. प. कार्यालयासमोर शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मनोज दीक्षित, सरचिटणीस एल.यू. खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषणाला सुरुवात केली. शिक्षकांचे मासिक वेतन दरमाह १ तारखेला द्यावे, सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे चार हफ्ते जी.पी.एफला पाठविण्यात यावे, १९९५ नंतर रुजू झालेल्या शिक्षकांना कायम झाल्याचे आदेश द्यावे, आदर्श शिक्षकांना वेतनवाढ लावावी, सहाव्या वेतन आयोगाची वेतन निश्चिती करणे, शिक्षकांच्या शिष्टमंडळाला दोन महिन्यातून एकदा चच्रेसाठी बोलावणे, या आदी मागण्यासांठी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, शिक्षकांच्या उपोषण मंडपाला जिल्हापरिषद उपाध्यक्ष मदन पटले यांनी भेट दिली व शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भात उचित पावले उचलणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डी. डी. िशदे यांनी शिक्षक समितीच्या पदाधिका-यांना चच्रेसाठी पाचारण केले. यावेळी शिक्षण सभापती मदन पटले, शिक्षणाधिकारी एच.यू. तुरकर प्रामुख्याने उपस्थित होते. चच्रेअंती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी  मागण्यांपकी अनेक मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन शिक्षक समितीला दिले.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीनेही, अरुण पारधी यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर आज आंदोलन करून मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकीऱ्यांना सादर केले, तर महाराष्ट्र राज्य आशासेविका संघटना व आयटक यांच्या संयुक्त वतीने जिल्ह्यााील आशासेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जि. प.च्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले.
दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आयटकचे जिल्हाध्यक्ष हौसलाल रहांगडाले यांच्या नेतृत्वाखाली आशासेविकांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी आशा संघटनेच्या शालूताई कुथे, करुणा गणवीर, भाविका साठवणे, मंगल बहेकार, प्रमिला रहांगडाले, ललिता टेंभरे, रेखा मरस्कोल्हे, उषा बारमाटे, माया कोरे, ललिता भगत, अनिता डोंगरवार, पुष्पा भांडारकर, चरणदास भावे, रामचंद्र पाटील यासह जिल्ह्य़ातील आशा स्वयंसेविका मोठा संख्येने उपस्थित होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा