कल्याण, नवी मुंबईत दोन वेगळ्या घटनांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दोन पोलीस आणि एका तोतया सरकारी कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले. कल्याणमध्ये महात्मा फुले पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक शंकर सावंत, पोलीस किशोर काळे यांना प्रतापसिंग परदेशी यांच्या तक्रारीवरून आठ हजारांची लाच घेताना चिकनघर येथे अटक करण्यात आली. प्रतापसिंग यांनी एका गुन्ह्य़ाप्रकरणी पोलीस ठाण्यात हजेरी लावली नव्हती. त्यासाठी या पोलीस कर्मचाऱ्यांनी लाच मागितली होती. दुसऱ्या घटनेत, आपण सरकारी नोकर आहोत. तुमच्या घराचा कर तुमच्या नावावर करून देतो असे सांगून शेखर जगताप या तोतया कर्मचाऱ्याने तक्रारदार राहुल भद्रे यांच्याकडे सहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. ऐरोली पालिका कार्यालयात ही रक्कम स्वीकारताना शेखरला अटक करण्यात आली. ममता डिसोझा, विजय सारभुकन यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कल्याण, नवी मुंबईत तीन लाचखोर अटकेत
कल्याण, नवी मुंबईत दोन वेगळ्या घटनांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दोन पोलीस आणि एका तोतया सरकारी कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले. कल्याणमध्ये महात्मा
First published on: 05-12-2013 at 08:38 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three bribe takers got arrested in kalyan navi mumbai