कल्याण, नवी मुंबईत दोन वेगळ्या घटनांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दोन पोलीस आणि एका तोतया सरकारी कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले.  कल्याणमध्ये महात्मा फुले पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक शंकर सावंत, पोलीस किशोर काळे यांना प्रतापसिंग परदेशी यांच्या तक्रारीवरून आठ हजारांची लाच घेताना चिकनघर येथे अटक करण्यात आली. प्रतापसिंग यांनी एका गुन्ह्य़ाप्रकरणी पोलीस ठाण्यात हजेरी लावली नव्हती. त्यासाठी या पोलीस कर्मचाऱ्यांनी लाच मागितली होती. दुसऱ्या घटनेत, आपण सरकारी नोकर आहोत. तुमच्या घराचा कर तुमच्या नावावर करून देतो असे सांगून शेखर जगताप या तोतया कर्मचाऱ्याने तक्रारदार राहुल भद्रे यांच्याकडे सहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. ऐरोली पालिका कार्यालयात ही रक्कम स्वीकारताना शेखरला अटक करण्यात आली. ममता डिसोझा, विजय सारभुकन यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा