कापूस वेचणीसाठी गेलेल्या आईसह तीन लहान मुलींचे मृतदेह शनिवारी रात्री शेतातील विहिरीत आढळून आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
पाटोदा तालुक्यातील घाटेवाडी येथे श्रीकृष्ण झणझणे हे कुटुंबासह राहतात. शनिवारी सकाळी त्यांची पत्नी आशाबाई आपल्या तीन लहान मुलींसह शेतामध्ये कापूस वेचणीस गेली होती. रात्री उशिरापर्यंत आशाबाई मुलींसह घरी परत न आल्यामुळे झणझणे यांनी शेतामध्ये त्यांचा शोध घेतला असता विहिरीत मुलगी प्रियंकाचा (वय ३) मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. त्यानंतर अन्य दोन मुली व आशाबाईचा शोध घेतला असता आशाबाई झणझणे (वय ३०), मयूरी (वय ८) व गुड्डी (वय ६) यांचे मृतदेह विहिरीत आढळून आले.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा