फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १५६ (३) अन्वये मग्रारोहयो अंतर्गत तहसीलदार व इतर अधिकारी, कर्मचारी यांच्यावर होणाऱ्या कारवाईस सरकारने प्रतिबंध करून शासकीय सेवकांना संरक्षण मिळावे, या मागणीसाठी महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने ३ दिवस काम बंद आंदोलन सुरू करण्यात आल्याची माहिती तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे मराठवाडा विभागाचे सचिव विद्याचरण कडवकर यांनी दिली.
कडवकर यांनी तहसीलदार कार्यालयात या प्रकरणी पत्रकार बैठकीत सांगितले की, नांदेडच्या घटनेमुळे महसूल विभागातील अधिकाऱ्यांची काम करण्याची मानसिकता राहिली नाही. सर्वाच्या मनावर दबाव निर्माण झाला. सध्या मराठवाडय़ात दुष्काळ, टंचाईसारखी गंभीर स्थिती आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तीन दिवस काम बंद आंदोलन करीत असून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

Story img Loader