शालेय समिती निवडीच्या वादातून दोन गटांत हाणामारीचा प्रकार घडला. यात तीनजण जखमी झाले. पोलीस जमादार किशन डुकरे यांच्या फिर्यादीवरून १४जणांविरुद्ध नरसी नामदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हिंगोली तालुक्यातील घोटा (देवी) येथे हा प्रकार घडला.
घोटा (देवी) येथील जि. प. प्रशालेत मंगळवारी शालेय समिती निवडीसाठी बैठकीचे आयोजन केले होते. बैठक सुरू होताच दोन गटांत काही मुद्दय़ांवरून बाचाबाची होऊन गदारोळ उडाला.
दरम्यान, बैठकीत एक मद्यपीने हस्तक्षेप करताच बाचाबाची हातघाईवर आली. हाणामारीत सरपंचाचा मुलगा दिगंबर प्रभाकर शेळके, गोकुळ किशन शेळके, मंगेश भगवान शेळके हे तिघे जखमी झाले.
प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार करून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेबाबात नरसी नामदेव पोलीस ठाण्याचे पोलीस जमादार किशन डुकरे यांच्या फिर्यादीवरून १४जणांविरुद्ध सार्वजनिक शांततेचा भंगप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
हाणामारीत तिघे जखमी; १४जणांवर गुन्हा दाखल
शालेय समिती निवडीच्या वादातून दोन गटांत हाणामारीचा प्रकार घडला. यात तीनजण जखमी झाले. पोलीस जमादार किशन डुकरे यांच्या फिर्यादीवरून १४जणांविरुद्ध नरसी नामदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हिंगोली तालुक्यातील घोटा (देवी) येथे हा प्रकार घडला.घोटा (देवी) येथील जि. प. …
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-01-2013 at 03:14 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three injured in fighting charges on 14 people