शांतीनगरातील एका घराला आग लागल्याने आग विझवताना तिघे होरपळले. त्या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नंदकिशोर रामटेके व हे कुटुंबीयांसह रात्री घरी झोपले होते. मध्यरात्रीनंतर पाऊण वाजताच्या सुमारास घराला अचानक आग लागली. अंगाला आगीची झळ बसल्यावरच कुटुंबीयांना जाग आली. घरातील पेटलेले सामान पाहून कुटुंब घाबरले. घरातून बाहेर पडण्यासाठी वनीता रामटेके, श्रावण हेटी व नंदकिशोर रामटेके यांनी सामानाला लागलेली आग विझवणे सुरू केले. महत्प्रयासाने ते घराबाहेर पडले. त्यांच्या आरडाओरडीमुळे शेजारी जागे झाले आणि त्यांची धावपळ उडाली. या घटनेत तिघांचे हात होरपळले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान तीन गाडय़ांसह तेथे पोहोचले. घरातील आगीवर त्यांनी पाण्याचा मारा करून आग तासाभरात विझविली. आगीत दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा