परभणी बाजार समितीच्या वतीने  तीन लाख रुपयांचा दुष्काळनिधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. दुष्काळ निधीचा धनादेश पणन मंडळाचे सरव्यवस्थापक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
परभणीसह मराठवाडय़ात सध्या भयानक दुष्काळ आहे. जालना व बीड जिल्ह्यांत पिण्याच्या पाण्याची तीव्र पाणीटंचाई आहे. जनावरांना चारा नाही. जालना व बीड जिल्ह्यांत सरकारच्या वतीने चारा छावण्या सुरू केल्या आहेत. परभणीत तुलनेने दुष्काळाची भयावह स्थिती नसली, तरी काही गावात पाण्याचे दुíभक्ष्य मात्र जाणवत आहे. शेजारच्या जिल्ह्यांतील शेतकरी दुष्काळाचा सामना करीत असताना त्यांना मदत करण्याच्या हेतूने परभणी बाजार समितीने दुष्काळ निधीस ३ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला. सभापती आमदार संजय जाधव, उपसभापती आनंद भरोसे आदींनी या कामी प्रयत्न केले. मदतीचा धनादेश पुणे येथे कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक यांच्याकडे सुपूर्द केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा