कंत्राटी कामगारांना आठ तासांसाठी १० हजार रुपये किमान वेतन द्यावे, वेगळा महागाई भत्ता द्यावा तसेच कायम करावे आदी विविध मागण्यांसाठी २० व २१ फेब्रुवारीला देशव्यापी संप होत आहे.
संपात औरंगाबाद जिल्ह्य़ातील ३ लाख कामगार, कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने पत्रकान्वये दिली.संप यशस्वी करण्यासाठी समितीतर्फे औद्योगिक परिसरात द्वारसभा घेऊन पत्रके वाटण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी, बीएसएनएल कर्मचारी यांची सभा घेण्यात आली. शुक्रवारी (दि. १५) सकाळी ११ वाजता तापडिया नाटय़मंदिर येथे निर्धार मेळावा आयोजित केला असून, ज्येष्ठ कामगार नेते र. ग. कर्णिक, अशोक थूल, डी. एल. कराड आदी नेते मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन कृती समितीचे निमंत्रक अॅड. उद्धव भवलकर, रंजन राणी, डॉ. महाआळणकर, जरारे, उमेश कुलकर्णी, के. एन. झा यांनी केले आहे.
देशव्यापी संपात औरंगाबादच्या तीन लाख कामगारांचा सहभाग
कंत्राटी कामगारांना आठ तासांसाठी १० हजार रुपये किमान वेतन द्यावे, वेगळा महागाई भत्ता द्यावा तसेच कायम करावे आदी विविध मागण्यांसाठी २० व २१ फेब्रुवारीला देशव्यापी संप होत आहे.
आणखी वाचा
First published on: 14-02-2013 at 12:39 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three lakhs workers of aurangabad will participating in national level strick