मराठी विज्ञान परिषदेतर्फे ‘वैद्यकशास्त्र’ या विषयावरील तीन पुस्तकांच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम २७ एप्रिल रोजी होणार आहे.
डॉ. रा. वि. साठे पारितोषिक डॉ. अविनाश वैद्य यांच्या ‘मलेरिया : कारणे आणि उपाय’ या पुस्तकाला, तर डॉ. चंद्रकांत वागळे पारितोषिक प्रा. जयप्रकाश म्हात्रे यांच्या ‘जनुकाची गोष्ट’ या पुस्तकाला मिळाले आहे. प्रा. डॉ. चंद्रकांत सहस्रबुद्धे यांच्या ‘रक्तशास्त्र’ पुस्तकाला डॉ. टी. एच. तुळपुळे पारितोषिक जाहीर झाले आहे. पारितोषिक वितरण सकाळी साडेदहा वाजता शीव-चुनाभट्टी (पूर्व) येथील परिषदेच्या विज्ञान भवनात होईल.
संग्रहित लेख, दिनांक 15th Apr 2014 रोजी प्रकाशित
वैद्यकावरील तीन पुस्तकांना पुरस्कार
मराठी विज्ञान परिषदेतर्फे ‘वैद्यकशास्त्र’ या विषयावरील तीन पुस्तकांच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम २७ एप्रिल रोजी होणार आहे.
First published on: 15-04-2014 at 06:19 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three medicine books got award