कर्नाटकातून गावठी रिव्हॉल्व्हर आणून विक्री करणाऱ्यास सांगली पोलिसांनी अटक करून तीन रिव्हॉल्व्हर जप्त केली आहेत. या रिव्हॉल्व्हरच्या खरेदी-विक्रीमध्ये असणाऱ्या सात जणांना रविवारी अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांनी पत्रकार बठकीत दिली.
गुंडा विरोधी पथकाने धनाजी ज्ञानदेव मोटे (३८, रा. कंठी, ता. जत) याला दोन दिवसांपूर्वी अहिल्यानगर (कुपवाड) येथे शस्त्रास्त्र तस्करीसाठी आलेला असताना ताब्यात घेतले होते. त्या वेळी त्याच्याकडून देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर व तीन काडतूस जप्त करण्यात आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने ज्ञानेश्वर पंडित सुतार (२८, रा. कवठेमहांकाळ) याला वर्षांपूर्वी एक रिव्हॉल्व्हर विकल्याचे सांगण्यात आले. हे रिव्हॉल्व्हर सुधीर भास्कर माने, श्रीकृष्ण विलास पाटील आदींमार्फत विकण्यात आले होते. याशिवाय धनाजी मोटे याने ज्ञानेश्वर सुतारमार्फत सचिन केराप्पा हुबाले (रा. नांगोळे, ता. कवठेमहांकाळ) याला ही विकण्यात आले होते. अशा पद्धतीने विक्री करण्यात आलेली तिन्ही देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर पोलिसांनी हस्तगत केले असून त्याच्यासोबत आठ जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी धनाजी मोटेसह ज्ञानेश्वर सुतार, श्रीकांत परदेशी, सुधीर माने, किरण कोळी, श्रीकृष्ण पाटील आणि सचिन हुबाले या सात जणांना अटक करण्यात आली आहे. रिव्हॉल्व्हरची किंमत दीड लाख रुपये असून कर्नाटकमधून हत्यारांची तस्करी होत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असल्याचे तपास अधिकारी सुनील महाडिक यांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्यांपकी श्रीकांत परदेशी हा महाविद्यालयीन शिक्षण घेणारा तरुण आहे. धनाजी मोटे याच्याकडून आतापर्यंत ११ देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
तीन रिव्हॉल्व्हर जप्त
कर्नाटकातून गावठी रिव्हॉल्व्हर आणून विक्री करणाऱ्यास सांगली पोलिसांनी अटक करून तीन रिव्हॉल्व्हर जप्त केली आहेत. या रिव्हॉल्व्हरच्या खरेदी-विक्रीमध्ये असणाऱ्या सात जणांना रविवारी अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांनी पत्रकार बठकीत दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-01-2014 at 03:06 IST
TOPICSरिव्हॉल्व्हर
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three revolver seized