बचतगट चळवळीने आता व्यापक स्वरूप धारण केले असून या माध्यमातून प्रत्येक महिलेने आपला आर्थिक विकास करून घेतला पाहिजे असे मत उपमहापौर गीतांजली काळे यांनी व्यक्त केले.
महिला दिनाच्या पुर्वसंध्येला विडी कामगारांच्या महिला बचतगट मेळाव्याचे उद्घाटन श्रीमती काळे यांच्या हस्ते झाले. नवभारतीय महिला व बाल कल्याण विकास संस्था, विरांगणा महिला परिषद व विश्वक्रांती महिला महासंघाने या मेळाव्याचे आयोजन केले होते. कमल गिरी, चंद्रकला गोंटय़ाल, सोनाली परळकर, विद्या एकलदेवी, ज्योती गोंटय़ाल, वीणा मावस आदी यावेळी उपस्थित होत्या.
घरबाहेर पडल्याशिवाय आत्मविश्वास निर्माण होत नाही. घरातील कामे तर करायची असतात, मात्र महिलांनी आता बाहेरचे विश्वही पहायला हवे, कुटुंबाच्या विकासाला हातभार लावणाऱ्या महिलांमध्ये समाजाच्या, राज्याच्या, देशाच्या प्रगतीला हातभार लावण्याचीही फार मोठी ताकद आहे. बचतगटांच्या माध्यमातून हा आत्मविश्वास मिळतो, त्यामुळेच देशभरात या चळवळीला व्यापक आधार मिळाला आहे असे उपमहापौरांनी सांगितले. विडी कामगार महिलाचे त्यांनी कौतूक केले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला कमल गिरी यांनी बचतगटाविषयी माहिती दिली.  अशा गटांना महापालिकेकडून आवश्यक ते सर्व सहकार्य देऊ, महिलांनी त्यासाठी आपल्याशी कधीही संपर्क साधावा असे उपमहापौर श्रीमती काळे यांनी सांगितले.

Story img Loader