प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने बेरोजगार युवकांमार्फत जनसाधारण तिकीट बुकिंग सेवक योजना सुरू केली आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने नागपूर, वर्धा, चंद्रपूर, परासिया, जुन्नारदेव या ठिकाणी जनसाधारण तिकीट बुकिंग सेवकांची नियुक्ती केली आहे. हे लोक प्रवाशांकडून तिकीटामागे एक रुपया आकारून रेल्वेचे अनारक्षित तिकीट देतात.
रेल्वे बोर्डातर्फे जनसाधारण तिकीट बुकिंग सेवकांमार्फत काही सेवा दिल्या जातात. यात प्रत्येक तिकीटामागे १ रुपया कमिशन, प्लॅटफॉर्म तिकीट देणे, मासिक सीझन तिकीटाचे नूतनीकरण करणे, वरिष्ठ नागरिकांचे सवलतीचे तिकीट जारी करणे यांचा समावेश असून, दररोज ८०० हून जास्त तिकिटांची विक्री होत असल्यास एक वेगळी खिडकी उघडली जाऊ शकते.
नागपूर विभागातील सर्व स्थानकांवर जनसाधारण तिकीट बुकिंग सेवकांच्या नियुक्तीसाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. या योजनेत निर्धारित रक्कम गुंतवून नियमित उत्पन्न मिळू शकते. बेरोजगार युवकही याचा लाभ घेऊ शकतात. इच्छुक युवकांनी विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांच्या कार्यालयात संपर्क साधावा, अशी सूचना प्रशासनाने केली आहे.

Story img Loader