सचिन तेंडुलकर याच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा सामना मुंबईत वानखेडे स्टेडियमवर होणार असून सचिनला अलविदा करण्यासाठी मुंबईचे डबेवाले स्टेडियमवर उपस्थित राहणार आहेत. डबेवाला गोविंद पथकातील काही सभासद तिकिटे काढून हा सामना पाहणार असल्याची माहिती मुंबई जेवण-डबे वाहतुक मंडळाचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी दिली.
मुंबईतील डबेवाले गेली १२३ वर्षे मुंबईत काम करत असून ते आत्तापर्यंत कधीही स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी गेले नव्हते. पण अवघ्या देशाचा आणि मुंबईकरांचा लाडका असलेल्या सचिनला निरोप देण्यासाठी या वेळी डबेवाले स्टेडियममध्ये हजेरी लावणार आहेत. या दिवशी डबेवाल्यांची मुंबईतील जेवणाचे डबे पोहोचविण्याची सेवा या दिवशी सुरू राहणार असल्याचेही तळेकर यांनी सांगितले.
२ ते ६ नोव्हेंबर डबेवाल्यांची सुट्टी
दिवाळीच्या निमित्ताने येत्या २ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत डबेवाल्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या कालावधीत मुंबईत जेवणाचे डबे पोहचविण्याचे काम बंद राहणार आहे. ७ नोव्हेंबरपासून डबेवाले पुन्हा कामावर हजर होणार आहेत, असल्याचे तळेकर म्हणाले.
आंबेडकर घराण्याच्या पाच पिढय़ांवरc

Story img Loader