महाराष्ट्राच्या टोकावरील झरी जामणी तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाघाचे हल्ले वाढल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. गेल्या तीन महिन्यांत वाघाने दोघांना ठार केले, तर दहा महिन्यांत २१ जनावरे ठार मारली आहेत. या वाढत्या हल्ल्यांमुळे जंगल परिसरातील शेतांमध्ये जाण्यास शेतकरी कचरत आहेत. अनेकांनी तर शेतात जाणेही बंद केले आहे. वाघाला पकडण्यासाठी वन अधिकाऱ्यांनी िपजरा लावला असला, तरी त्यात वाघ अद्याप अडकलेला नाही. त्यामुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागलेला आहे.
आदिवासीबहुल झरी जामणी तालुक्यातील घनदाट सागवान जंगलात वर्षभरापासून वाघाचा वावर वाढला आहे. गेल्या १० महिन्यांत तालुक्यातील माथार्जुन, कोडपािखडी, पवनार, पांढरकवडा, कोसारा, डोंगरगाव, अडेगाव, सिंधीवाढोणा, पिल्कीवाढोणा आदी गावांतील २० पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या गायी, म्हशी, कालवड, वासरू व बलांची शिकार वाघाने केली आहे. त्यामुळे या गावांतील नागरिक आता दहशतीखाली आहेत. शिवाय, दुभाटी गावातील एक महिला आणि बोपापूर येथील तरुणाचा वाघाने फडशा पाडला आहे. शेतमजूर व नागरिकांनी शिवारातील रस्त्याने जाणे बंद केले आहे.
तालुक्यातील जंगल क्षेत्रात नेमके किती वाघ आहेत, याबाबत संभ्रम आहे. मध्यंतरी वन विभागाकडून एका मादीसह चार वाघ असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, या माहितीतही नेमकेपणा नव्हता, तसेच झरी तालुक्यातील डोंगरगाव येथील महादेव रामपुरे, देविदास महाकुलकार, पांढरकवडा येथील रामदास चिकराम, कोसारा येथील जगन्नाथ टोंगे, प्रभाकर कोडापे, संदीप ठाकरे, अडेपाव येथील प्रकाश ठाकरे, श्यामराव दुरतकर, सिंधीवाढोणा येथील रमेश ताडपेल्लीवार, विनय काकडे, माथार्जुन येथील पुंजाराम मेश्राम, उमरीचे विलास नगराळे, परसोडीचे देवराव मेश्राम, कोडपािखडीचे हरिभाऊ राऊत, पिल्कीवाढोणाचे गजानन ढेंगरे, पवनार येथील अनिल लेणपुरे व नामदेव कोटे, गणेशपूर येथील तुळशीराम आसुटकर, सालेभट्टी येथील शेतकरी कृष्णाराव कुडमेथे यांच्या जनावरांची वाघाने शिकार केली. यासंदर्भात शेतकऱ्यांनी वन विभागाकडे नुकसान भरपाईची मागणी केली असून, वन विभागाने यातील काही शेतकऱ्यांना भरपाई दिलेली आहे. पांढरवाणी परिसरातील दुभाटी येथे गेल्या १९ ऑगस्टला वाघाने शेतात काम करणाऱ्या फुलाबाई टेकाम यांना ठार करून जंगलात फरफटत नेले होते. फुलाबाई टेकाम यांच्या कुटुंबीयांना वन विभागाकडून ५ लाखांची मदत देण्यात आली आहे. यानंतर २५ ऑक्टोबरला संजय जंगलेकर शिवारातून परत येत असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जंगलात परफटत नेले होते. या दोन्ही घटनांमध्ये शोधाशोध केल्यानंतर लचके तोडलेले मृतदेह नातेवाईकांच्या हाती लागले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा