मलकापूर नगरपंचायत निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कराड शहर पोलिसांनी सक्त कारवाईचा बडगा उगारला आहे. निवडणुकीदरम्यान, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आत्तापासूनच गुन्हेगारी कारवायांना लगाम घालण्यासाठी ठोस कृती सुरू केली आहे. पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे यांच्यासह ६ अधिकारी व ३० कर्मचारी कारवाईची कृती अमलात आणत आहेत. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या १० जणांना पोलिसांडून ताब्यात घेण्यात आले असून, दारूसह इतर रसद पुरविणाऱ्यांवर सध्या पोलिसांची करडी नजर आहे.
पोलिसांनी मलकापुरात ढेबेवाडी मार्ग, दांगट वस्ती, कोयना वसाहत प्रवेशद्वार, मलकापूर फाटा, बैलबाजार मार्ग याठिकणी अचानकपणे नाकाबंदी केली. त्यात सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. यावर परवाना नसल्याबाबत ६ जणांवर, नंबरप्लेटप्रकरणी एकावर, ट्रीपलसीटप्रकरणी ७ जणांवर, मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्या दोघांवर व वाहन चालविताना कागदनपत्र जवळ न बाळगल्याप्रकरणी ५५ जणांवर अशा एकूण ७१ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यानुसार टाळगाव येथील मामाचा ढाबा या ढाब्यावर छापा टाकण्यात आला. तेथून २४ हजार ९०० रुपयांची दारू जप्त करण्यात आली. तसेच ढाबाचालक शंकर पिलाजी जाधव यालाही अटक करण्यात आली. रेकॉर्डवरून पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची यादी तयार केली आहे. त्यामध्ये २४ गुन्हेगारांचा समावेश असून, निवडणूक होईपर्यंत संबंधितांच्या हालचालीवर पोलिसांकडून वॉच ठेवला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा