स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये मतदानाचे प्रमाण वाढावे, या साठी ई-मतदानाचा प्रयोग हाती घेता येऊ शकतो का, याची चाचपणी राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात आहे. राज्याच्या निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी शुक्रवारी सांगितले. एका कार्यक्रमासाठी त्या येथे आल्या होत्या.
मोबाईल व इंटरनेटद्वारे मतदानाच्या प्रक्रियेस राजकीय पक्षांकडून विरोध झाल्याचेही त्यांनी नमूद केले. काही झोपडपट्टय़ांमधून उमेदवार मोबाईलच विकत घेऊन देतील आणि मतदान होईल, अशी शंका उपस्थित केली गेली. त्यामुळे हा प्रस्ताव बारगळला.राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तसे मतदानाचे प्रमाण तुलनेने चांगले असते. मात्र, मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी काही नवे प्रयोग करण्याचा प्रयत्न हाती घेण्यात आला होता. महापालिकांच्या व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या काळात दीड ते दोन लाख कर्मचारी मतदानापासून वंचित राहतात. त्यांना मतदान प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी एक विशेष सुविधा उपलब्ध करून द्यावी, असा प्रस्ताव आहे.
व्हॅनवर ‘ई’ पद्धतीने मतदान घेता येऊ शकते काय, याची चाचपणी केली जात आहे. काही संस्थांमध्ये तसेच वृद्धाश्रम व वसतिगृहांमधून अशाप्रकारे मतदान करता येऊ शकते का, हे तपासले जात आहे. मोबाईल व संगणकावरून ई-मेलद्वारे मतदान करण्याला मात्र राजकीय पक्षांचा विरोध आहे. यात बऱ्याच प्रकारे घोटाळे होऊ शकतात, असे पक्षीय कार्यकर्ते सांगतात. त्यामुळे हा प्रस्ताव तूर्तास बारगळला असून कुशल तांत्रिक व्यक्तींची या कामी मदत घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा