महापालिकेच्या वतीने १५ महिन्यांपासून वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन करण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ २० जून रोजी सकाळी ११ ते २ या कालावधीत राजीव गांधी भवनसमोर आंदोलन करण्याचा निर्णय आम आदमी पार्टीतर्फे घेण्यात आला आहे.
वृक्ष प्राधिकरण समितीच अस्तित्वात नसल्याने शहर परिसरातील पर्यावरणाच्या संवर्धनार्थ पालिकेकडून होणे अपेक्षित असलेल्या घडामोडी थांबल्या आहेत. त्यामुळेच आम आदमी पार्टीतर्फे ४ व १२ जूनला राजीव गांधी भवनसमोर ११ ते २ या वेळेत निदर्शने करण्यात आली होती.
पालिका आयुक्तांना सर्वपक्षीय १२ पर्यावरणवादींची नावे सुचविण्यात आली होती. लवकरच समिती स्थापन करण्यात येईल, असे आयुक्तांचे म्हणणे आहे. परंतु गुरुवारी होणाऱ्या महासभेच्या विषयपत्रिकेत वृक्ष प्राधिकरण समितीचा विषय समाविष्ट करण्यात आलेला नसल्याने पार्टीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात वृक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमी नाशिककरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वृक्ष प्राधिकरण समितीसाठी आज ‘आम आदमी’चे आंदोलन
महापालिकेच्या वतीने १५ महिन्यांपासून वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन करण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ २० जून रोजी सकाळी ११ ते २ या कालावधीत राजीव गांधी भवनसमोर आंदोलन करण्याचा निर्णय आम आदमी पार्टीतर्फे घेण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-06-2013 at 08:23 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Today andolan from aam admi for tree authority committee