राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उद्या (रविवारी) आर. आर. पेट्रोलपंपासमोरील मदानावर माखनचोर दहीहंडी फोड स्पर्धा आयोजित केली आहे. अभिनेत्री महिमा चौधरी स्पर्धेस उपस्थित राहणार आहे.
स्पध्रेतील विजेत्यांना प्रथम पारितोषिक १ लाख १ हजार, द्वितीय ५१ हजार व तृतीय ३१ हजार रुपये देण्यात येणार आहे. उद्घाटन राज्यमंत्री फौजिया खान यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी माजी मंत्री सुरेश वरपुडकर तर प्रमुख म्हणून आमदार बाबाजानी दुर्राणी, महापौर प्रताप देशमुख, जि.प. अध्यक्षा मीना बुधवंत, जि.प. गटनेते बाळासाहेब जामकर, उपाध्यक्ष समशेर वरपुडकर, माजी खासदार सुरेश जाधव, स्थायीचे सभापती विजय जामकर, उपमहापौर सज्जूलाला उपस्थित राहणार आहेत. स्पर्धकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे, शहर जिल्हाध्यक्ष स्वराजसिंह परिहार, युवक जिल्हाध्यक्ष गंगाधर जवंजाळ, महिलाध्यक्षा शशिकला चव्हाण आदींनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा