भाजपच्या गोंदिया जिल्ह्य़ाच्या वतीने उद्या, ६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता स्थापना दिवस कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक भवभूती रंगमंदिर रेलटोली येथे करण्यात आले आहे. विनोद अग्रवाल यांची पक्षाच्या जिल्हाध्यपदी निवड झाल्यानंतर प्रथमच यावेळेस स्थापन दिवसाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला भाजपचे माजी राष्ट्रीय संघटनमंत्री संजय जोशी, आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजकुमार बडोले, आमदार खुशाल बोपचे, जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, उपाध्यक्ष मदन पटले, जि.प.अर्थ व बांधकाम सभापती प्रकाश गहाणे, महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, समाजकल्याण सभापती कुसन घासले, कृषी व पशुसंवर्धन सभापती मोरेश्वर कटरे, हेमंत पटले, चुन्नीलाल ठाकूर, केशव मानकर, नेतराम कटरे, भेरसिंह नागपुरे, राकेश शर्मा, रचना गहाणे, दयाराम कापगते, अशोक इंगळे, भजनदास वैद्य, हरिश मोरे, खोमेश रहांगडाले, राधेश्याम अग्रवाल, अशोक वांदिले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. भाजपचा स्थापना दिवस कार्यक्रमाचे आयोजन बऱ्याच वर्षांनंतर करण्यात येत आहे. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडावा, यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्य़ातील सर्व भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. गाव तेथे भाजप हा संदेश कार्यकर्त्यांना देऊन सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्याचे काम भाजप कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन देखील जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले आहे. जिल्ह्य़ातील सर्व भाजप कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संतोष चव्हाण, अंजनकर, सुभाष आकरे, छबीलाल रहांगडाले, श्यामराव शिवणकर, डॉ.गजानन डोंगरवार, प्रमोद संगीडवार, खेमराज लिल्हारे, अॅड.उपराडे, चतुभरूज बिसेन, डी.के. झरारिया, संजय कुळकर्णी, सिताबाई यांनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा