पेठवडगाव (ता.हातकणंगले) नगरपालिकेच्या एका रिक्त जागेसाठी उद्या रविवार (२३ जून) रोजी मतदान होत असून सत्तारूढ यादव गट आपली निर्विवाद सत्ता कायम राखणार की राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी या पोटनिवडणुकीच्या निमित्तातून तरी पालिकेत प्रवेश करणार? याकडे विशेषत: स्थानिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
नगराध्यक्षपदाचा भवितव्य ठरविणारा प्रभाग म्हणून लक्षवेधी ठरलेल्या पेठवडगावातील या प्रभागातून देवदास पोळ विजयी झाले. मात्र पदापासून वंचित राहिले. त्यांच्या निधनानंतर मध्यंतरी जाहीर झालेली पोटनिवडणूक मतदारयाद्यांतील गोंधळावरून रद्द झाली. त्यातील सुधारणेनंतर जाहीर पोटनिवडणुकीत देवदास पोळ यांचे सुपुत्र अभिजित हे सत्तारूढ यादव गटातून तर राष्ट्रवादीच्या चिन्हावर विरोधी आघाडीचे प्रजापिता सनदी यांच्यात दुरंगी लढत रंगली आहे.
पेठवडगाव पालिकेच्या एका जागेसाठी आज मतदान
सत्तारूढ यादव गट आपली निर्विवाद सत्ता कायम राखणार की राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी या पोटनिवडणुकीच्या निमित्तातून तरी पालिकेत प्रवेश करणार? याकडे विशेषत: स्थानिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
First published on: 23-06-2013 at 01:49 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Today election for 1 seat of pethwadgaon mnc