जिल्ह्य़ातील कवलेवाडा येथील दलित जळीत प्रकरणी आंबेडकरी संघर्ष समितीतर्फे उद्या शुक्रवारी ‘गोंदिया बंद’चे आवाहन करण्यात आले आहे.
गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा येथील संजय खोब्रागडे यांना १७ मे च्या रात्री रॉकेल टाकून जिवंत जाण्याच्या प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात प्रथमदर्शनी सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. मात्र अवघ्या दोन दिवसात पोलिसांनी या प्रकरणातील खरे आरोपी संजय खोब्रागडेंची पत्नी देवकाबाई व तिचा प्रियकर राजू गडपायले हे असल्याचे तपासातून उघडकीस आणले. गोंदिया येथील आंबेडकरी संघर्ष समितीने पोलिसांचे हे दावे फेटाळून पोलीस या प्रकरणाला दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप केला आहे.
यामुळे या प्रकरणाने वेगळी कलाटणी घेतली असून पुन्हा आंबेडकरी बांधवांमध्ये पोलिसांविरूद्ध असंतोष निर्माण झाला आहे. या प्रकरणाचा पारदर्शक तपास करण्याकरिता हे प्रकरण सीआयडीकडे देण्यात यावे, या मागणीसाठी धरून आंबेडकरी संघर्ष समितीच्या वतीने या प्रकरणाच्या निषेधार्थ २३ मे रोजी ‘गोंदिया बंद’ पुकारण्यात आला आहे. यामुळे हा प्रकरण आणखी किती तापणार याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
आंबेडकरी संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या आक्षेपात पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात या घटनेचा गूढ उकलून दोन आरोपींना गजाआड केले. यामध्ये संजयची पत्नी देवकाबाई खोब्रागडे व राजू गडपायले या दोघांचा समावेश आहे. या दोन्ही आरोपीने गुन्हा कबूल केला आहे, अशी माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली. परंतु दुसरीकडे या घटनेला पोलीस एक वेगळे स्वरूप देण्याचे प्रयत्न करीत आहेत. पोलिसी खाक्या दाखवून देवकाबाई व राजू गडपायले या दोघांना गुन्हा कबूल करण्यास बाध्य करण्यात आले, असा आरोप आंबेडकरी संघर्ष समितीने केला आहे. यामुळे पोलिसांच्या निषेधार्थ संघर्ष समितीने २३ मे शुक्रवार रोजी ‘गोंदिया बंद’ पुकारण्यात आला आहे. समितीने आज उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून या घटनेचा निषेध केला. पोलिसांचे कृत्य िनदनीय असल्याचे सांगून २३ मे रोजी होणा-या शहर बंदच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन समितीने केले आहे.
या धरणे आंदोलनात सतीश बंसोड, राजू राहुलकर, विनोद बंसोड, प्रफुल्ल भालेराव, अॅड. राजकुमार बोंबार्डे, योगेश बंसोड, रतन वासनिक, योगेश राऊत, रतन गणवीर, सुनील आवळे, राजू भेलावे, यशपाल डोंगरे, शुद्धोधन सहारे यासह शेकडो कार्यकत्यार्ंचा समावेश होता.
तणावपूर्ण शांतता
कवलेवाडा येथे सहाव्या दिवशीही तणावपूर्ण शांतता होती. राज्य शासनाला दखल घ्यावी लावणा-या या प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडवून देणा-या संजय खोब्रागडे जळीत प्रकरणामुळे कवलेवाडा ग्राम प्रकाशझोतात आले. या गावाला अनुसूचित जाती-जमातीचे आयोगाचे अध्यक्ष सी.एस. थूल व मंत्री नितीन राऊत यांनी घटनेच्या तिस-या दिवशी भेट दिली. या संपूर्ण प्रकरणाकडे कवलेवाडा येथे भयभीत वातावरण आहे. गावात गेल्या सहा दिवसांपासून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा