कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या ११५ व्या जयंतीनिमित्त चांदोरी येथील क. का. वाघ महाविद्यालयाच्या वतीने २४ जून रोजी सायंकाळी पाच वाजता येथील महाकवी कालिदास कलामंदिरात लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांची प्रकट मुलाखत होणार आहे. ‘मराठी तरूण आणि उद्योग व्यवसाय’ या विषयावर लेखक नंदन रहाणे हे मुलाखत घेणार असल्याची माहिती क. का. वाघ शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. के. एस. बंदी, चांदोरी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. संतोष वाघ यांनी दिली.
काकासाहेब वाघ यांच्या जयंतीनिमित्त वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कर्मवीरांच्या कार्याला प्रेरणा देण्याच्या हेतूनेच मनोहर जोशी यांच्यासारख्या व्यक्तींची व्याख्याने आयोजित केली जातात असे प्रा. बंदी, प्राचार्य वाघ यांनी सांगितले. वाघ शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमधून कर्मवीर महोत्सव, कर्मवीर क्रीडा महोत्सव, कर्मवीर एक्स्पो यासारखे विविध उपक्रम राबविले जातात. जिल्हा पातळीवर ‘कर्मवीर व्याख्यानमाला’ सारखा उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस असून वर्षभरातील प्रत्येक महिन्यात एक उपक्रम राबवून कर्मवीरांना आगळी-वेगळी श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असल्याचेही संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा