दिव्याच्या झगझगाटात सोन्या जवाहिऱ्यांनी सजलेल्या आनंदी चेहऱ्याच्या लक्ष्मीला आमंत्रित करून उद्या, मंगळवारी घरोघरी व प्रतिष्ठांनामध्ये लक्ष्मीची पूजा करण्यात येणार आहे. यावेळी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आले आहे. पंचांग अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदोषकाळी म्हणजेच सायंकाळी ५.४० ते ८.१० दरम्यान लक्ष्मीची पूजा करावी. ज्यांना शिवलिखती मुहूर्तावर लाभसमयी लक्ष्मीपूजन करावयाचे असेल त्यांनी रात्री ८ ते ९.३० या वेळेत पूजन करावे. ज्यांना स्थिर लग्नावर लक्ष्मीची पूजा करावयाची असेल त्यांनी सायंकाळी ५.४४ ते ८.४८ या वेळेत व शुभ मुहूर्तावर पूजा करायची असेल तर रात्री ११.३० ते १२.३० या वेळेत पूजा करावी, अशी माहिती पंचागकर्त्यां विद्या राजंदेकर यांनी दिली.
 लक्ष्मीपूजनानंतर परिसरात राहणाऱ्यांना घरी बोलावून प्रसाद द्यावा, लक्ष्मीपूजनाच्यावेळी घराला आंब्याचे तोरण बांधावे, व्यापारांनी वही खात्याची पूजा करावी, लक्ष्मीपूजनासाठी बाजारात लक्ष्मीच्या आकर्षक मूर्ती विक्रीसाठी आल्या आहेत.
४० रुपयापासून २०० रुपयापर्यंत लक्ष्मीची मूर्ती बाजारात उपलब्ध आहे. या शिवायप्रसादासाठी लाह्य़ा, बत्तासे-चिरंजी, उटणे व पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची बाजारातच खरेदी केली जात आहे. अनेक भागात खरेदीसाठी लोकांची गर्दी उसळळी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा