स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर दाखल दरोडय़ाचे गुन्हे मागे घ्यावेत, या प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करावी, या मागणीसाठी उद्या (गुरुवारी) गंगाखेड रस्त्यावरील िपगळगड नाल्यावर संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
उसाला ३ हजार रुपये पहिली उचल द्यावी, या मागणीसाठी संघटनेने राज्यभर आंदोलन सुरू केले. आंदोलनाच्या समर्थनार्थ संघटनेच्या येथील कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. त्यात कार्यकर्त्यांवर दरोडय़ाचे गुन्हे दाखल झाले. हे गुन्हे कोणाच्या तरी सांगण्यावरुन दाखल झाले. त्यामुळे गुन्हे दाखल करताना संबंधीत पोलीस अधिकाऱ्याचे कोणाशी बोलणे झाले, याची चौकशी करावी, अशी मागणी करताना या प्रकरणात पोलिसांनी आíथक व्यवहार केल्याचा आरोपही संघटनेने केला. या बाबत पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. त्यावर जिल्हाध्यक्ष माणिक कदम, दिगांबर पवार, त्र्यंबक िशदे, बाळासाहेब कदम, शेख आयुब, मो. तकी आदींच्या सह्य़ा आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा