केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त १२ डिसेंबरला जिल्हाभरात आरोग्य मेळावे आयोजित करणार आहेत.तसेच जिल्ह्य़ातून १० हजार शुभेच्छा संदेश पाठवण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीकडून आलेल्या निर्देशानुसार राज्यभरातून विश्वविक्रमी १२ लाख, १२ हजार १२ शुभेच्छा संदेश द्यावयाचे आहेत. त्यासाठी जिल्ह्य़ातील सर्व पदाधिकारी कामाला लागले असून शुभेच्छा संदेशाची पुस्तके तालुका पातळीवर पोहोचवण्यात आली आहेत. जिल्ह्य़ासाठी १० पुस्तके देण्यात आली असून ही सर्व पुस्तके रथयात्रेद्वारे एकत्रित केली जाणार असून या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचा प्रचार व प्रसार केला जाणार आहे. जिल्हाभरात एकाच दिवशी आरोग्य मेळावे घेणार असल्याचे धर्मरावबाबा आत्राम म्हणाले. पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रकाश ताकसांडे, तालुकाध्यक्ष संजय निखारे, ऋतुराज हलगेकर, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष अनिल खेवले, रवींद्र वासेकर, विवेक ब्राह्मणवाडे, इरफान पठाण, सोनाली पुण्यपवार यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा