कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ होण्याकरिता सहा जिल्ह्य़ातील वकिलांनी आंदोलन सुरू केले आहे. या मागणीला पाठिंबा देण्याकरिता उद्या गुरुवारी कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्र्वभूमीवर बुधवारी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने यांनी एका पत्रकाव्दारे प्रसिध्दीस दिली आहे.    
उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात सुरू व्हावे अशी गेल्या २५ वर्षांपासून मागणी आहे. या मागणीकरिता सहा जिल्ह्य़ातील वकिलांनी संयुक्तपणे आंदोलन सुरू केले आहे. हे खंडपीठ कोल्हापूर येथे लवकरात लवकर सुरू झाल्यास नागरिक, व्यापारी, उद्योजक, वाहतूकदार व व्यावसायिक या सर्वांना त्याचा लाभ होणार आहे. या न्याय्य मागणीसाठी उद्या गुरुवारी कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्र्वभूमीवर बुधवारी चेंबर ऑफ कॉमर्सने आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा