मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रावेर-वाघोडा रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या पुलाच्या कामासाठी मंगळवारी ‘अप’ मार्गावर ‘मेगा ब्लॉक’ केला जाणार आहे. यामुळे सकाळी साडेआठ ते दुपारी अडीच या कालावधीत अप आणि डाऊन दिशेने धावणाऱ्या प्रवासी गाडय़ा काही अंशी विलंबाने धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
या ‘मेगा ब्लॉक’पूर्वी २३ तारखेला डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक करण्यात आला होता. त्या वेळी भुसावळ-इटारसी पॅसेंजर ही अंशरीत्या रद्द करून ती बऱ्हाणपूर ते इटारसी या मार्गावर सुरू ठेवण्यात आली होती. तसेच तेव्हा डाऊन मार्गावरील वास्को निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपूर एक्स्प्रेस, डाऊन मार्गावरील अन्य एक्स्प्रेस गाडय़ांना रावेर येथे थांबविण्यात येऊन एकमार्ग वाहतूक व्यवस्थेद्वारे अप मार्गावरून रवाना करण्यात आल्या. त्यामुळे ११०७२ अप वाराणसी सीएलटीटी (कुर्ला), कामायनी एक्स्प्रेस बऱ्हाणपूर येथे, तर १२१०८ अप लखनौ एलटीटी (कुर्ला) एक्स्प्रेस वाघोडा येथे थांबविण्यात आल्या होत्या. मंगळवारी होणाऱ्या अप मार्गावरील मेगा ब्लॉकमुळे कोणत्याही प्रवासी गाडीचे पूर्णपणे अथवा अंशिकरीत्या रद्द करण्यात आल्या नसून त्या दिवशी सकाळी साडेआठ ते दुपारी अडीच वाजेदरम्यान धावणाऱ्या अप मार्गावरील १५१०८ अप गोरखपूर एलटीटी (कुर्ला) एक्स्प्रेस सुमारे अर्धा तास उशिराने तसेच अप व डाऊन मार्गावरील अन्य प्रवासी गाडय़ा डाऊन मार्गावरून एकेरी वाहतूक पद्धतीने चालविण्यात येणार असल्याने त्या देखील काही काळ विलंबाने धावण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा