उल्हास नदीतील पाणी साठय़ाच्या नियोजनाकरिता कळवा लघु पाटबंधारे विभागाकडून १४ टक्के पाणी कपात करण्यात येणार असल्याने स्टेम पाणी पुरवठा कंपनीकडून होणारा पाणी पुरवठा दर बुधवारी बंद राहाणार आहे. त्यामुळे येत्या बुधवार २८ नोव्हेंबर,सकाळी ९ ते गुरुवार २९ नोव्हेंबर, सकाळी ९ या कालावधीत (शटडाऊन  कारवाई असणार आहे) पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
या कालावधीत ठाणे शहर, सिद्धेश्वर, महागिरी, ऋतू पार्क, उथळसर, नौपाडा, वृंदावन, श्रीरंग, पाचपखाडी, चरई, कळवा, खारेगाव, रेतीबंदर व मुंब्रा येथील काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच या शटडाऊनमुळे पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे. 

Story img Loader