आजचे शिक्षण आदिवासींच्या उत्थानासाठी की बरबादीसाठी, असा प्रश्न ‘वाडाकार’ प्रा. माधव सरकुंडे यांनी स्मृतीपर्व-२०१२ मधील व्याख्यानमालेतील ‘आदिवासी व विमुक्तांचे शिक्षण’ या विषयावरील परिसंवादात केला.
ते पुढे म्हणाले की, आदिवासींसाठी शिक्षण हे मोठे शस्त्र आहे. त्यासाठी संविधानात डॉ. आंबेडकरांनी तरतूद केली. आश्रमशाळा आहेत पण त्यासाठी शिक्षणाधिकारी नाही. आमचे शिक्षण आजच्या काळात सबळ नाही. हे शिक्षण आमच्या उत्थानासाठी की बरबादीसाठी आहे, हेच कळत नाही. गुलामगिरी नष्ट करत बाबासाहेबांनी संविधानातून अधिकार दिले. खासगीकरणातून हेच अधिकारही नष्ट करण्याचे काम सुरू आहे. आपण सर्व वेगवेगळे आहोत. वेगळ्या मार्गाने एकाच टेकडीवर चढत आहोत. आपले ध्येय एकच असल्याचे प्रा. माधव सरकुंडे यांनी यावेळी सांगितले. आदिवासी व भटक्या-विमुक्त जमातींच्या समस्या या विषयावरील परिसंवादात प्रा. खंडारे, डॉ. धुर्वे, प्रा. वडते, डॉ.राठोड यांनी विचार व्यक्त केले . प्रास्ताविक एम.के. कोडापे यांनी, तर संचलन प्रेरणा कन्नके यांनी केले.
आजचे शिक्षण आदिवासींचे उत्थान की बरबादी -प्रा. सरकुंडे
आजचे शिक्षण आदिवासींच्या उत्थानासाठी की बरबादीसाठी, असा प्रश्न ‘वाडाकार’ प्रा. माधव सरकुंडे यांनी स्मृतीपर्व-२०१२ मधील व्याख्यानमालेतील ‘आदिवासी व विमुक्तांचे शिक्षण’ या विषयावरील परिसंवादात केला.
आणखी वाचा
First published on: 05-12-2012 at 01:41 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Todays education is helpfull or loss of aadivasisays prof sarkunde