पुणे ते गुजरात व्हाया बदलापूर
मोनो, मेट्रो या अत्याधुनिक दळणवळणांच्या साधनांपासून ठाणे जिल्ह्य़ातील शहरांना अद्याप वंचित ठेवणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने यंदाच्या अर्थसंकल्पात मात्र कल्याणपल्याडच्या रहिवाशांना किंचित दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या आठवडय़ात एमएमआरडीएने मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आणि मुंबई-पुणे महामार्ग जोडणाऱ्या शिरसाड फाटा ते बदलापूर या ३७ किलोमीटरच्या चौपदरी रस्त्याला मंजुरी दिली. विशेष म्हणजे ७८० कोटी रुपये खर्चाचा हा रस्ता ‘टोल फ्री’ असणार आहे.
वाडा-शिरसाड फाटा ते पडघा, खडवली, गुरवली, आपटी-जांभुळमार्गे हा रस्ता बदलापूरला जोडला जाणार आहे. कल्याण तालुक्यातील ३५ गावांना या रस्त्याचा फायदा होईल. या रस्त्यासाठी खडवली, गुरवली येथे रेल्वे मार्गावर तर भातसा (राया), काळू (उतणे) आणि उल्हास (आपटी) या नद्यांवर पूल उभारले जाणार आहेत. २० जूनला या कामाची निविदा निघाली असून येत्या दीड वर्षांत रस्त्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. या रस्त्यामुळे सध्या उल्हासनगर, कल्याण आणि डोंबिवली परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. कारण पुण्याहून येणारी अवजड वाहने परस्पर बदलापूरमार्गे गुजरातकडे जाऊ शकतील. त्यामुळे वेळ आणि इंधनाचीही बचत होऊ शकेल.
कल्याणपल्याड एमएमआरडीएची ‘टोल फ्री’ खैरात
मोनो, मेट्रो या अत्याधुनिक दळणवळणांच्या साधनांपासून ठाणे जिल्ह्य़ातील शहरांना अद्याप वंचित ठेवणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने यंदाच्या अर्थसंकल्पात मात्र कल्याणपल्याडच्या रहिवाशांना
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-07-2014 at 10:00 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Toll free after kalyan