येथील आदिवासी कवी पीतांबर कोडापे यांचा ‘उरस्कल’ हा काव्यसंग्रह येत्या १७ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या आदिवासी उलगुलानवेध साहित्य संमेलनात प्रकाशित होणार आहे.  या काव्यसंग्रहाचे प्रकाशन संमेलनाध्यक्ष डॉ. वासुदेव मुलाटे यांच्या हस्ते, खासदार विलास मुत्तेमवार, मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्ष वर्षां पटेल, दलित साहित्यिक प्रा. कुमुद पावडे, नाशिकचे आदिवासी आयुक्त संभाजीराव सरकुंडे, झारखंडच्या सुप्रसिद्ध कवयित्री निर्मला पुतुल, दिल्ली येथील रमणिका गुप्ता, आमदार डॉ. नामदेव उसेंडी, आमदार राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
 या काव्यसंग्रहाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी प्राध्यापक परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप विटाळकर यांनी पुरस्कार लिहिला असून प्रस्तावना प्रा. डॉ. विनायक तुमराम यांची लाभली आहे. ५० कवितांच्या या संग्रहाचे मुखपृष्ठ नागपूरचे चित्रकार संजय धोतरकर यांनी रेखाटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा