शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सेनेच्या पदाधिकारी मेळाव्यानिमित्त रविवारी (दि. ४) येथे येत असतानाच सेनेतील काही असंतुष्टांनी संपर्कप्रमुख रवींद्र मिल्रेकर यांच्यासह दोन्ही जिल्हाप्रमुखांना बदलण्यात यावे, अशी मागणी ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
जिल्ह्यात सेनेअंतर्गत चार वर्षांपासून संघटनात्मक पातळीवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्या. नियुक्त्या करताना सर्व लोकप्रतिनिधींचे मत कधीही विचारात घेतले गेले नाही. संघटनात्मक पातळीवर समन्वय नसल्याने असे प्रकार घडत असून पदाधिकारी नियुक्त्या व फेरबदल पक्षासाठी नुकसानकारक ठरत आहे. या सर्व विस्कळीतपणास संपर्कप्रमुख मिल्रेकर कारणीभूत असून त्यांच्यामुळेच जिल्ह्यात सेना पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष व नाराजीची भावना असल्याकडे निवेदनात लक्ष वेधले आहे.
बबनराव वडधुतीकर, संजय साडेगावकर, बंडू लांडगे, वसंत खराटे, काशिनाथ घुमरे, प्रताप कदम आदींची नावे या निवेदनात आहेत. परभणी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून २५ वषार्ंपासून परिचित असताना संघटनात्मक पातळीवर वेळीच लक्ष न दिल्यामुळे अनेक शिवसनिक पक्षातून बाहेर पडले आहेत. जे बाहेर पडले त्यांना नाराजीचे कारणसुद्धा कधी विचारले गेले नाही, असेही निवेदनात म्हटले आहे. डॉ. विवेक नावंदर, मोहन फड, बालाजी देसाई, दत्ता मोगल, दत्ता कदम, अशोक काकडे, राजेंद्र लहाने, विशाल कदम, विमल पांडे या शिवसेनेत पदाधिकारी असलेल्यांनी इतर पक्षांत जाऊन पदे मिळवली, याकडेही निवेदनात लक्ष वेधले आहे. निवेदनात सेलू, जिंतूर तालुक्यातील शिवसनिकांच्या सह्य़ा आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा