या जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमधील एकूण सात पोलीस पोलीस निरीक्षकांना सारख्याच पदावर इतरत्र हलविण्यात आले.
 गोंदियाच्या वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षक सुनील घुगे यांची बदली ठाणे येथील शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली. गोंदिया शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सुनील बोंडे यांची बदली नागपूर शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. गोंदिया नक्षल सेलचे पोलीस निरीक्षक रवींद्र कापगते यांची बदली नागपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात, तर तिरोडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक प्रमोद मडामे यांची बदली नागपूर शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यातील निरीक्षक जितेंद्र कोळी यांची बदली पुणे शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली. रामनगर ठाण्याचे निरीक्षक रवींद्र शेळके यांची बदली सोलापूर येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली, तसेच देवरी नक्षल सेलमधील पोलीस निरीक्षक राजेश नंदीमठ यांची बदली बृहन्मुंबईच्या पोलीस ठाण्यात करण्यात आली.
पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश काल सायंकाळी काढण्यात आले. मात्र, बदली करण्यात आलेल्या संबंधित घटकात त्यांची पदे रिक्त आहेत किंवा नाही, ही माहिती मिळेपर्यंत त्यांना सध्याच्या नियुक्तीच्या ठिकाणातून कार्यमुक्त केले जाणार नाही, असे शासन आदेशात नमूद केले आहे.

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
special fund of 20 lakhs each to all departmental offices of Mumbai Municipal Corporation
सुविधांसाठी पालिकेचे पाच कोटी, पालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांना प्रत्येकी २० लाखांचा विशेष निधी
former ministers who rebel and won
अनेक माजी मंत्री, आमदारांचा बंडखोरी करून विजयाचा इतिहास, देशमुख, केदार, बंग, जयस्वाल आदींचा समावेश
Bigg boss 18 karan veer Mehra chum darang shrutika arjun rajat dalal seven contestants nominated
Bigg Boss 18: सहाव्या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रिया ‘अशी’ पार पडली, घराबाहेर जाण्यासाठी सात सदस्य झाले नॉमिनेट
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Eknath Shinde, Naresh Mhaske,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच महायुतीचे कर्णधार – खासदार नरेश म्हस्के
dr shraddha tapre
बुलढाणा: डॉक्टर झाले, पण राजकारणात रमले! श्रद्धा टापरे ठरल्या आद्य डॉक्टर आमदार; यंदाही नऊ जण रिंगणात