नामदेवराव बानोरे यांना लीलानाथ प्रतिष्ठानतर्फे ‘कृतार्थ’ पुरस्कार
काही माणसे कुटुंबापुरती जगतात, काही आपल्या गावापुरती, तर काहींचे आयुष्य देशाला वाहिलेले असते. विश्वनाथ पंताचे वैशिष्टय़ असे की, सारे यवतमाळ शहर त्यांचे कुटूंब झाले. त्यामुळेच त्यांची स्मृती कुटुंबीयांनी सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानकर्त्यां यवतमाळकरांचा सन्मान करून जागती ठेवण्याचा उपक्रम सुरू केला. प्रकृती नियमानुसार जे जगतात त्यांचे जगणे आयुष्य असते आणि इतरांच्या आनंदासाठी जगणे म्हणजे या आयुष्याचे जीवनात रूपांतर करणे होय, असे प्रतिपादन उमेश वैद्य यांनी येथे केले.
लीलानाथ प्रतिष्ठानच्या वतीने १४ ऑगस्टच्या रात्री येथील पाटबंधारे सांस्कृतिक भवनात शानदारपणे आयोजिलेल्या कृतार्थ पुरस्कार प्रदान सोहळ्यात मंचावर निवड समितीचे राजन टोंगो, आयोजन समितीचे विनायक निवल, लीला बनगिनवार, मिलिंद बनगिनवार, विद्या शेट्टीवार, प्राची बनगिनवार आदि सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. गौरवमूर्ती नामदेवराव बानोरे आणि विवेक कवठेकर प्रामुख्याने उपस्थित होते. गौरवमूर्ती बानोरे यांनी विवेक कवठेकरांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत
८४ वर्षांच्या आयुष्याचा पट उलगडला. या सोहळ्यात विद्या शेट्टीवार यांनी प्रास्ताविकात प्रतिष्ठानच्या प्रारंभ आणि आजवरच्या सोहळ्यांचा आढावा घेतला. गौरवमूर्ती  नामदेवराव बानोरे या वेळी प्रतिष्ठानच्या वतीने लीला  बनगीनवार, मिलिंद बनगिनवार, राजू बनगिनवार, प्राची बनगिनवार, विद्या शेट्टीवार, राजन टोगो, विनायक निवल, राजू बेदरकर, राजाभाऊ भगत, माधवी देशपांडे, दीपक देशपांडे, सदानंद देशपांडे, दीपक सवाने, सविता जुमळे, राजू बंडेवार, ललिता घोडे यांना मानाचा फेटा बांधून तसेच शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह
१० हजार गौरवकाशी  आणि मानपत्र प्रदान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चतन्य देशपांडे यांनी केले.

Story img Loader