स्टेट बँकेच्या येथील शाखेतील जनसेटचा अचानक स्फोट झाल्याने ग्राहकांची एकच धांदल उडाली. सुदैवाने या र्दुघटनेत कोणतीही हानी झाली नाही.
वीज वितरण कंपनीने गुरुवारी सकाळी सव्वादहा वाजता राहाता शहरात भारनियमन सुरु केले. या काळात स्टेट बँकेत जनरेटर सुरू होता. तो सुरु असतानाच दुपारी सव्वाच्या सुमारास जनसेट इंजिनचा अचानक स्फोट होवून मोठय़ा आवाजाबरोबरच धुराचे लोळ हवेत झेपावले. अचानक झालेला स्फोट व हवेत झेपावलेल्या धुरांच्या लोळामुळे बँकेत आलेल्या ग्राहकांची एकच धांदल उडाली. काही काळ चांगलीच घबराट निर्माण झाली होती. योग्य देखभालीअभावी इंजिनाचा  स्फोट झाल्याचे सांगण्यात येते.