भारतीय भाषांमध्ये मोबाइल आणावा यासाठी गेली अनेक वष्रे विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये तीन माजी ‘आयआयटीयन्स’नी बाजी मारली असून त्यांनी तयार केलेला भारतीय भाषा समजून आपले म्हणणे इंग्रजीत पोहोचवणारा ‘फर्स्ट टच’ मोबाइल लवकरच बाजारात दाखल होणार आहे.
मोबाइल वापरताना अनेकांना इंग्रजी नीट जमत नसल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही समस्या विशेषत: ग्रामीण भागात जाणवते. यावर तोडगा म्हणून काही मोबाइल कंपन्यांनी आपल्या मोबाइलमध्ये िहदी भाषा आणली. काहींनी मराठीही आणली. पण सध्याच्या मोबाइलमध्ये आपल्याला मराठी टायिपगची सुविधा नाही. यासाठी आपल्याला काही अ‍ॅप्स डाऊनलोड करून घ्यावे लागतात. या अ‍ॅप्समध्येही मनाजोगी मराठी भाषा टाइप करता येत नाही. यामुळे यावर अधिक संशोधन होणे गरजेचे होते.
याच दिशेने आयआयटीमधून पदवी मिळवलेले राकेश देशमुख, आकाश डोंगरे आणि सुधीर बंगरामबंदी यांनी मिळून ‘मोफर्स्ट’ या कंपनीची स्थापना करून काम करण्यास सुरुवात केली. ग्रामीण भागात अनेक मोबाइलधारक असे आहेत की ज्यांना िहदी किंवा इंग्रजी नीट समजू शकत नाही. अशांना त्यांच्या भाषेत जर ती माहिती मिळण्याची सोय केली तर त्यांचा मोबाइलचा वापर अधिक सुकर होईल या उद्देशाने या तिघांनी भाषांतर करणारा मोबाइल तयार केला. या मोबाइलमध्ये आपण जे इंग्रजी टाइप करू ते भारतीय भाषेत उमटण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये सध्या िहदी, मराठी आणि गुजराती या तीन भाषांचा समावेश आहे.
या मोबाइलमध्ये आपण इंग्रजीत ‘हाऊ आर यू’ असे टाइप केल्यानंतर तेथे देण्यात आलेली भाषांतराची कळ दाबून आपण ते आपल्याला पाहिजे त्या िहदी, मराठी किंवा गुजराती भाषेत भाषांतरित करून घेऊ शकतो. इतकेच नव्हे तर आपण यामध्ये संपूर्ण फोनची भाषा बदलू शकतो. ते केल्यावर आपल्याला त्या-त्या भाषेचा की-बोर्डही मिळतो. यामुळे हा भाषांतरकार मोबाइल खरोखरच उपयुक्त ठरू शकतो.
‘मोफर्स्ट’ ही कंपनी सुरुवातीला आयफोनसाठी अ‍ॅप बनविण्याचे काम करत असे. त्यांनी तयार केलेले मोतीलाल ओसवाल कंपनीचे अ‍ॅप हे त्यांचे पहिले अ‍ॅप होते. यानंतर त्यांनी अँड्रॉइड, ब्लॅकबेरी अशा ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणारी ‘एम कॉमर्स’ची विविध अ‍ॅप्स तयार केली आहेत. त्यांनी तयार केलेला ‘फर्स्ट टच’ हा फोन त्यांच्या आतापर्यंतच्या प्रकल्पांपेक्षा खूप वेगळा आणि तांत्रिकदृष्टय़ा अधिक किचकट असा होता. यामध्ये त्यांना आता यश आले आहे. हा मोबाइल ग्रामीण भागातील लोकांना डोळ्यांसमोर ठेवून तयार करण्यात आला आहे. यामुळे त्याची किंमत केवळ सहा हजार रुपये इतकीच ठेवण्यात आली आहे. हा फोन सध्या गुजरातमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.
कसा आहे फोन
हा एक स्मार्टफोन असून यामध्ये आपल्याला
खालील सुविधा देण्यात आल्या आहेत.
* अँड्रॉइडची जेली बीन ऑपरेटिंग सिस्टीम.
* १.२ गीगाहर्ट्झचा प्रोसेसर
* चार इंचांचा डिस्प्ले
* ५१२ एमबी रॅम
* चार जीबी रिड ओन्ली मेमरी
* एसडी कार्डच्या साह्य़ाने मेमरी ३२ जीबीपर्यंत वाढविता येते
* दोन मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा तर ०.३ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा
* दोन सिम
* थ्रीजी, टूजी, वायफाय, ब्लूटूथ – बॅटरीची क्षमता १३०० एमएएच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा