बॉलीवूडमध्ये गाण्याचे चित्रीकरण, गाण्याची निवड आणि संगीत या विषयी प्रचंड कुतूहल असते. विशेष म्हणजे प्रेक्षकांबरोबरच बॉलीवूडमधील कलावंत-तंत्रज्ञांमध्येही याविषयी उत्सुकता असते. आता श्रीदेवीने प्रमुख भूमिका साकारलेल्या ‘चालबाज’ या चित्रपटातील ‘ना जाने कहा से आयी है’ हे गाजलेले गाणे थोडय़ा वेगळ्या ढंगात ‘आय मी और हम’ या जॉन अब्राहमच्या महत्त्वााकांक्षी चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
‘ना जाने कहा से आयी है’ऐवजी नवीन चित्रपटात ‘ना जाने कहा से आया है’ म्हणताना प्राची देसाई आणि चित्रांगदा सिंग दिसणार असून त्यांनी म्हटलेल्या गाण्यावर जॉन अब्राहम नृत्य करणार आहे.
नृत्य-अभिनय यामध्ये फारसा वाखाणला न गेलेला जॉन अब्राहम नृत्य करणार आहे हे या गाण्याचे वैशिष्टय़ आहे. जुने गाणे नव्या ढंगात सादर करून चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी त्याचा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे, असे दिग्दर्शक कपिल शर्मा यांनी सांगितले.
कमाल अमरोही स्टुडिओत या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले. श्रीदेवीचेही सर्वात चांगले चित्रित झालेले गाणे आहे म्हणून ते वापरावे अशी कल्पना पुढे आली.
जॉन अब्राहम प्रमुख भूमिकेत असल्यामुळे त्याच्यावर गाणे चित्रित करताना प्राची देसाई किंवा चित्रांगदा सिंग जॉनसोबत नृत्य करताना दाखविणार नाही तर जॉन एकटाच नृत्य करणार आहे. या गीतातून प्राची देसाई आणि चित्रांगदा सिंग जॉनबद्दल सांगू पाहत आहेत.
‘स्टायलिश’ सेलिब्रिटी म्हणून जॉन अधिक प्रसिद्ध आहे. त्याच्या स्टाईलला शोभेल असेच हे गाणे चित्रित करण्यात आले आहे, सिनेमाच्या सूत्रांनी सांगितले.
सीक्वेलपटांमुळे तसेच मूळ चित्रपटांचा रिमेक असलेल्या चित्रपटांची संख्या वाढत असून त्यात आता जुन्या चित्रपटांतील गाणे आजच्या पद्धतीने थोडेसे बदलून नवीन सिनेमात दाखविण्याचा ट्रेण्डही यामुळे सुरू होऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा