समस्त शिवसनिकांचे आराध्य दैवत हिंदू हृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन विविध कार्यक्रमांनी व संकल्प करून संपन्न झाला. येथील सुभाष चौकातील मुख्य कार्यक्रमात बाळासाहेबांच्या प्रतिमेस शिवसेना सातारा जिल्हा उप प्रमुख राजेश उर्फ बंडा कुंभारदरे यांच्या हस्ते पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर शहराच्या विविध संघटनांच्या मार्फत पुष्पांजली वाहण्यात आली.
सर्वप्रथम, बाळासाहेबांच्या विचारांची ज्योत सदैव मराठी माणसाच्या व शिवसनिकांच्या मनात तेवत राहो यासाठी दीपप्रज्वलन करण्यात आले. मा. बाळासाहेबांचे विचार अमर असून त्याचे सदैव स्मरण ठेवून त्यांनी दिलेल्या महामंत्राद्वारे शिवसनिक मराठी माणसासाठी व िहदुत्वासाठी सदैव कार्यरत राहील, अशा शब्दांत जिल्हा उपप्रमुख राजेश उर्फ बंडा कुंभारदरे यांनी आदरांजली वाहिली. अशाच प्रकारचे विचार व आदरांजली महाबळेश्वर शिवसेना शहर प्रमुख विजय नायडू, किशोर कोमटी यांनी वाहिली.
प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त मा. बाळासाहेबांचे मौलिक विचार असलेले भव्य पोस्टर्स शहरभर लावण्यात आले होते. त्यानंतर मुंबईतील कार्यक्रमास अनेक शिवसेना पदाधिकारी रवाना झाले. कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक मुरलीधर भिसे, नाना कदम, राजेश गुजर, महेश (अण्णा) पलोड, सचिन पवार ,सागर फळणे,चेतन मोरे, समाधान चौधरी, विजयकुमार दस्तुरे वकील, गणेश जाधव, सुनील यादव, भिकुभाई ठक्कर, दिलीप कानडे, प्रशांत भोसले, अभिजित कानडे,रवींद्र भगत(शाखा प्रमुख) सादिक वारुणकर, अशोक शिंदे, अंकुश इगावे आदी मान्यवर उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 18th Nov 2013 रोजी प्रकाशित
शिवसेनाप्रमुखांना महाबळेश्वर येथे आदरांजली
समस्त शिवसनिकांचे आराध्य दैवत हिंदू हृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन विविध कार्यक्रमांनी व संकल्प करून संपन्न झाला.
First published on: 18-11-2013 at 01:48 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tribute to balasaheb thackeray in mahabaleshwar