भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरात विविध ठिकाणी त्यांना आदरांजली वाहून अभिवादन करण्यात आले. भडकल गेट व विद्यापीठ परिसरात कार्यकर्त्यांनी अभिवादनासाठी गर्दी केली होती. सर्व शासकीय कार्यालयांत, तसेच चौका-चौकात बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पसुमने अर्पण करणाऱ्यांची गर्दी होती.
भडकल गेटजवळील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला सर्वच प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. विद्यापीठात या निमित्ताने विशेष व्याखानांचे आयोजन करण्यात आले होते.
लातूरात अभिवादन
वार्ताहर, लातूर
महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकर पार्क येथील आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळय़ास शहरातील आबालवृद्धांनी अभिवादन केले. महापौर स्मिता खानापुरे, उपमहापौर सुरेश पवार, काँग्रेस गटनेते विक्रमसिंह चौहान यांच्यासह नगरसेवक, कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रदेश सरचिटणीस संजय बनसोडे, मुर्तुजा खान, विनोद रणसुभे, राजा मणियार, भाजपतर्फे डॉ. सुनील गयकवाड, अभिमन्यू पवार, भीमशक्तीचे प्रदेश सरचिटणीस मोहन माने, जि. प. चे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्यंकट बेद्रे आदींनी अभिवादन केले. लोकसेवा मंडळ व रा. स्व. संघाच्या वतीने संयुक्तपणे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात १५३ जणांनी रक्तदान केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फेही दिवसभर रक्तदान शिबिर सुरू होते.
संग्रहित लेख, दिनांक 7th Dec 2013 रोजी प्रकाशित
महामानवास अभिवादन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरात विविध ठिकाणी त्यांना आदरांजली वाहून अभिवादन करण्यात आले. भडकल गेट व विद्यापीठ परिसरात कार्यकर्त्यांनी अभिवादनासाठी गर्दी केली होती.

First published on: 07-12-2013 at 01:55 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tribute to dr babasaheb ambedkar