शहरातील दिल्ली गेटजवळ सकाळी नऊच्या सुमारास एका भरधाव वेगाने जाणाऱ्या मालमोटारीने दोन दुचाकींना धडक दिली. या अपघातात २० वर्षांचा युवक मृत्युमुखी पडला. अश्विन सुरेश इंगळे असे मृत युवकाचे नाव असून, शाहबाजार परिसरातील नगरसेवक इंगळे यांचा तो मुलगा होत. या अपघातानंतर त्याला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्या दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी झाला आहे.
सकाळी नऊच्या सुमारास अश्विन सुरेश इंगळे हर्सूलकडून दिल्ली गेटकडे येत होता. याच रस्त्यावर सुरेश वाघ हे त्यांच्या दुचाकीवरून दुधाचा वरवा देण्यासाठी चालले होते. पाठीमागून आलेल्या मालमोटारीने त्या दोघांना जोराची धडक दिली. दोन दुचाकींना उडवून वेगाने मालमोटारीचा चालक पुढे निघून गेला. अपघात झाल्याचे लक्षात येताच तो वाहनातून पळून गेला. प्रताप सोनावणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शेख रफीक शेख मेहबूब यास निष्काळजीपणे वाहन चालविण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या अश्विनला पाहण्यास घाटी रुग्णालयात मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे पोलिसांना बंदोबस्तात वाढ करावी लागली. शाहबाजार भागातही बंदोबस्त वाढविण्यात आला.

Story img Loader