अक्कलकोट येथील शिवपुरीच्या विश्व फौंडेशन व सोलापूर आकाशवाणी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अनमोल पृथ्वी अभियान’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत पर्यावरण रक्षण व संवर्धनाबाबतच्या नावीन्यपूर्ण कल्पना तथा आराखडे मागविण्यात येत आहेत. यापैकी तीन उत्कृष्ट प्रयत्न तथा प्रकल्पांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.
यासंदर्भात माहिती देताना शिवपुरीच्या विश्व फौेंडेशनचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांनी सांगितले की, पर्यावरण रक्षण व संवर्धनाबाबत समाजात पर्यावरणप्रेमींकडून नवीन प्रकल्प, कल्पना तथा आराखडे राबविले जात आहेत. या कार्याबद्दलची माहिती दोन छायाचित्रांसह लेखी स्वरूपात येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत पोहोचेल अशा बेताने कार्यक्रम प्रमुख, सोलापूर आकाशवाणी केंद्र, जुना कुंभारी रस्ता, एमआयडीसी, सोलापूर-४१३००६ या पत्त्यावर पाठवावी, असे आवाहन डॉ. राजीमवाले यांनी केले. शक्य झाल्यास दहा मिनिटांची ऑडिओ-व्हिडिओ सीडी पाठवावी. पाकिटावर ‘पर्यावरण रक्षणासाठी माझा प्रयत्न’ असा उल्लेख करावा. प्राप्त झालेल्या पहिल्या तीन उत्कृष्ट साहित्यकृतींना विश्व फौंडेशनच्यावतीने येत्या १२ मार्च रोजी आयोजित विश्व अग्निहोत्र कार्यक्रमात रोख बक्षिसे व आयुर्वेद उत्पादने देण्यात येणार आहेत, असे डॉ. राजीमवाले यांनी नमूद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा