नगरसेवक अरीफ शेख यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा गोकुळवाडी परिसरातील काही गुंडांचा प्रयत्न सुरू असून त्यांना तडीपार करावे अशा मागणीचे निवेदन या भागातील नागरिकांनी मोर्चाने येऊन तोफखाना पोलीस ठाण्यात दिले.
प्रभाग क्रमांक ३० मधील गोकूळवाडी परिसरात अलीकडेच पोलिस तसेच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कॅरमचा अनधिकृत अड्डा उद्ध्वस्त केला. याशिवाय या भागात अनेक गैरधंदे सुरू असतात, त्यामुळे महिलांना जाण्यायेण्यास त्रास होतो. अनेकांनी याबाबत तक्रारी केल्यावर पोलीसी कारवाई सुरू झाली. ती शेख यांच्यामुळेच सुरू झाली असे समजून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न गुंडाकडून सुरू आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे. निवेदनात त्यांनी या गुंडांची नावेही दिली आहेत.
त्यामुळे या सर्वच भागातील गैरधंद्यांची चौकशी करावी, त्याला जबाबदार असलेल्यांना तडीपार करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. परिसरातील १०० पेक्षा अखि नागरिकांनी दिलेल्या या निवेदनावर कार्यवाही करण्याचे आश्वासन पोलिसांना त्यांना दिले. नगरसेवक शेख हेही यावेळी त्यांच्या समवेत होते.

Story img Loader