आपल्या भ्रमणध्वनीवर एखाद्या अनोळखी क्रमांकावरून कोणाचा फोन आला, तर तो क्रमांक शोधण्यासाठी ‘ट्र कॉलर’ हे अ‍ॅप्लिकेशन मदतीला येते. स्मार्टफोनमध्ये सध्या त्याची चलती आहे. या अ‍ॅपने आता ‘ट्विटर’ या मायक्रो ब्लॉगिंग कम्युनिटीशी करार केला आहे.
यामुळे ट्र कॉलरवर आता आपल्याला मिळणाऱ्या माहितीमध्ये ती व्यक्ती ट्विटर वापरते की नाही याचीही माहिती मिळणार आहे.
आयओएस, अँड्रॉइड, ब्लॅकबेरी, विंडोज या ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या स्मार्ट फोनमध्ये ‘ट्र कॉलर’ हे अ‍ॅप वापरता येते. फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि ती कोणत्या भागातील आहे
याची माहिती या अ‍ॅप्समुळे मिळते. यात आता ती व्यक्ती ‘ट्विटर’वर आहे का याची माहितीही मिळणार आहे. या संदर्भात अलीकडेच मुंबईत ट्विटर आणि ट्र कॉलर यांच्यात करार झाला आहे.

Story img Loader