गढी किंवा गुप्तधनात मिळालेल्या सोन्याच्या नकली गिन्न्या खऱ्या असल्याचे भासवून गंडविण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना शहर पोलिसांनी गुरुवारी  सापळा रचून अटक केली. आरोपींकडून नकली सोन्याच्या गिन्न्या व एक धारदार शस्त्र जप्त करण्यात आले.
नकली सोने विकण्याचा प्रयत्न होणार असल्याची खबर मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार उत्तम जाधव यांनी सकाळपासूनच गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांना मोहिमेवर पाठविले होते. दरम्यान, सायंकाळी ५ वाजता नकली सोने विकण्याच्या प्रयत्नात असलेले दोन सराईत गुन्हेगार पोलिसांच्या नजरेस पडले. हे दोघे व्यावसायिकाला ठरविण्यासाठी शोध घेत होते. एवढय़ात पोलिसांनी सापळा रचून एकाला व्यावसायिक बनवून त्यांच्याजवळ पाठविले. त्यानंतर पोलिसांचा अंदाज खरा ठरला. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याजवळ नकली सोन्याच्या ५७५ ग्रॅम वजनाच्या शंभरहून अधिक गिन्न्या व धारदार चाकूही सापडला. पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे रावसाहेब सदाशिव पवार (२२, रा. लाखनवाडा) व रघु दादाराव पवार (२५, रा.अंत्रज) अशी आहेत.
गेल्या आठवडय़ात संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील विजय वर्मा यांना याच दोघांनी अशाच प्रकारचे नकली सोने देऊन २ लाखाने गंडविले होते. त्यामुळे आरोपींकडून अनेक फसवेगिरीच्या प्रकरणांची माहिती उघड होऊ शकते, असे ठाणेदार उत्तम जाधव यांनी सांगितले. या आरोपींवर खून, दरोडा, घरफोडी, लुटमार असे गुन्हे दाखल आहेत. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कावरे, पोलीस उपनिरीक्षक शुभांगी देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरपालसिंह राजपूत, संतोष धनोकार यांनी सहभाग घेतला.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?
Story img Loader